भुसावळ रनर्स तर्फे आज प्रसाद पाटील यांचे व्याख्यान

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे उद्‍या दि.३ मार्च रोजी “धावणे यशस्वी व निरोगी जीवनाचे रहस्य” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान नाहाटा महाविद्यालयातील ‘ग्रंथालय सभागृह’ येथे दुपारी ४-३० वाजता आयोजित करण्यात आले आहे .सावदा येथील मुळ रहिवाशी व पुणे येथील प्रसिद्ध मॅरेथॉन पटू व लाइफ कोच प्रसाद पाटील श्रोत्यांना मार्गदर्शन करतील.
आजच्या धकाधकीच्या व व्यस्त जीवनात प्रत्येकाने आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणे ही एक कला आहे .ही कला आत्मसात केली तरच जीवन सुखी व समृद्ध होईल त्यामुळे प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ देणे देखील महत्त्वाचे आहे.
भुसावळ रनर्स तर्फे महिलादिनी दि.८ मार्च रोजी ‘बी सारा लेडीज इक्वलिटी रन’ चे आयोजन करण्यात आले आहे .सदरच्या रनमध्ये ८०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला आहे .या सहभागी स्पर्धकांना या व्याख्यानाचा निश्चितच लाभ होईल असे या कार्यक्रमाचे समन्वयक प्रविण पाटील यांनी कळवले आहे.
प्रसाद पाटील हे व्यावसायिक प्रशिक्षक असून मोठमोठ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांच्या व्याख्यानाचा लाभ श्रोते घेत असतात, तसेच पुणे शहरात ते नवोदित धावपटूंना मार्गदर्शन करून मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी प्रोत्साहित करीत असतात. शिवाय ते एक उत्कृष्ट वक्ते व धावपटू आहेत.त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ भुसावळ शहरातील नागरिकांनी घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष डाॅ.प्रविण फालक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *