यावल ( प्रतिनिधी )-
येथील पोतीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अंजाळे शिवारात मोर नदीच्या काठावर आणी तसेच भालशिव पिंप्री शिवारातील तापी नदीपात्रात व परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टया उद्धवस्थ केल्या. पोलिसांनी केलेल्या याकार्यवाहीचे परिसरातील महीलांनी स्वागत केले असुन अवैधदारू विरुद्धच्या मोहिमेत सातत्य राहावे , अशी मागणी महिलांनी केली आहे .या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यात विविध गावांमध्ये मोठया प्रमाणावर घातक रसायनाद्वारे तयार केलेली गावठी हातभट्टीची दारू मोठया प्रमाणावर विक्री होत असुन यादारूच्या शेकडो तरुणांसह अल्पवयीन मुले व गावकरी आहारी गेले व अनेकांचे कुटुंब उद्धस्थ होत असल्याचे यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्याकडे तक्रारी आल्या . त्यांनी विषयाची गांर्भीयाने दखल घेत आज दिनांक २ मार्च रोजी तालुक्यातील अंजाळे येथे मोर नदीकाठावर व भालशिव पिंप्री या शिवारातील असलेले तापी नदीच्या पात्रात सुरु असलेल्यां तिन गावठी हातभट्टीच्या भट्टया उद्धस्थ केल्या असुन यात सुमारे ४०० लिटर दारूचे कच्चे रसायने भरलेले ड्रम (टाक्या ), जागीच नष्ट केल्या असुन,घटनास्थाळावरून २० लिटर तयार दारू जप्त करण्यात आली आहे .तापी नदीच्या पात्रानजिक असलेल्या खोऱ्यात टाकलेल्या या धाड़ीत संशयित तीन जण फरार झाले आहे .
पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मुजफ्फर खान , संजय देवरे यांनी कारवाई केली असून या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .



