रावेरात दुचाकी चोरासह चोरीच्या सात दुचाकी जप्त; रावेर पोलिसांची कामगिरी

रावेर तालुक्यातील लालमाती येथील अरमान अजीत तडवी (रा.लालमाती, ता.रावेर) या दुचाकी चोरास पोलिसांनी अटक केली आहे. या दुचाकी तपासात चक्क सात दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या असून या आरोपीकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .
तक्रारदार अमर पाटील यांची 12 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची बॉक्सर दुचाकी (एम.एच.19 बी.9946) ही चोरी गेल्याने या प्रकरणाचा रावेर पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश चौधरी यांना लालमातीच्या संशयीतांची माहिती मिळाली होती. त्यानंतर हवालदार राजेंद्र राठोड, पोलिस नाईक निलेश चौधरी, संदीप धनगर, नरेंद्र बाविस्कर, मंदार पाटील आदींनी आरोपी अरमान अजित तडवी (रा.लालमाती) यास अटक केली असता आरोपी तडवीने रावेर परीसरातून सात दुचाकी चोरल्याची कबुली देत दुचाकी काढून दिल्या. जप्त दुचाकींमध्ये बजाज बॉक्सर, टीव्हीएस व्हिक्टर, हिरो पॅशन प्रो, बजाज फोर एस, यामाहा, बजाज सिटी 100, हिरो आदी दोन लाख 42 हजार रुपये किंमतीच्या दुचाकींचा समावेश आहे. ज्या तक्रारदारांची दुचाकी चोरीला गेली आहे अशांनी मूळ कागदपत्रे दाखवून पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रावेर पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *