भुसावळ शहर काँग्रेसची उद्या बैठक

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील शासकीय विश्रामगृहात दि.४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्‍या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्‍या आदेशानुसार बुथ कमिटीचे पुनर्गठन करणे, शाखा स्थापन करणे बाबत चर्चा करण्यासाठी व महिला दिन साजरा करण्यासाठी चर्चा बैठकीत होणार आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्याक विभाग, मागासवर्गीय विभाग, महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, माजी आमदार,माजी नगरसेवक इत्यादी कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्‍थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष रविंद्र निकम व सरचिटणीस शैलेश अहिरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *