भुसावळ (प्रतिनिधी )-
अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्या सयुंक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने १० फेब्रुवारी रोजी महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.चार गटातील १२ विजेत्यासह २५८ सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना रविवारी दि.१ अंतर्नाद प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनी गौरवण्यात आले.अध्यक्षस्थानी श्रीराम ड्रिपचे अध्यक्ष उद्योजक श्रीराम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा ना.ऱंजना पाटील,ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डाॅ.मोहन फालक,सिध्दवेद इन्फोटेकचे महेश फालक,गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांची उपस्थिती होती.
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील प्रत्येक वर्गातील ३ विद्यार्थी यानुसार ३० विद्यार्थ्यांची अंतिम फेरी नहाटा महाविद्यालय अभ्यासिका हॉल येथे रविवारी पार पडली. परीक्षक म्हणून श्रीकांत जोशी, सतीश कुलकर्णी,दीपक पाटील, रिता शर्मा,दिनकर जावळे, अमितकुमार पाटील, निलेश नेहते, गणसिंग पाटील ,अलका भटकर यांनी काम पाहिले.
अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.बक्षीस वितरण शुभारंभा प्रसंगी दादासाहेब दामू पांडू माध्यमिक विद्यालय सुनसगावच्या विद्यार्थीनी ममता शिरसाळे, खुशबू काटे, नेहा पाटील, कोमल शिरसाळे, रोशनी कोळी यांनी सुंदर असा पोवाडा म्हटला त्यांना एच.डी.गाढे आणि सिताराम बिऱ्हाडे यांनी वाद्यावर साथ दिली.त्यानंतर वर्धापनदिनाच्या निमित्ताने विजय चौधरी यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानवर स्वरचित एक गित सादर केले.

प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख जिवन महाजन यांनी केले.योगेश इंगळे यांनी अंतर्नादच्या सात वर्षातील उपक्रमाचा आढावा सादर केला.नेव्हीचे कॅप्टन संदीप रायभोळे आणि सामाजीक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल अमित चौधरी यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.समन्वयीका हेमांगिनी चौधरी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.स्पर्धकातर्फे पालवी चौधरी हिने नमुना वकृत्व सादर केले त्यानंतर स्पर्धेच्या ४० परिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भटकर,शैलेंद्र महाजन यांनी तर आभार स्पर्धा सहसमन्वयक समाधान जाधव यांनी मानले.यशस्वीतेसाठी प्रभाकर नेहते,देव सरकटे,प्रदीप सोनवणे ,प्रा.श्याम दुसाने,आर आर धनगर,भूषण झोपे,निवृत्ती पाटील ,सुनील वानखेडे,प्रा.पंकज पाटील ,राजू वारके,शैलेंद्र वासकर,प्रसन्ना बोरोले,नाना पाटील,वंदना भिरुड,जीवन सपकाळे,जयसिंग इंगळे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते
पहिला गट
प्रथम साक्षी मनोहर नेहते (ताप्ती पब्लिक स्कुल), द्वितीय दिपक गोपाळ सोनार (कै.भा.धो.पाटील ), तृतीय सिध्दी मंगलेश पाटील ( सेंट अलायसेस )
द्वितीय गट प्रथम कादंबरी विजय चौधरी ( अहिल्याबाई कन्या विद्यालय ),द्वितीय गुंजन संजय मावळे (अहिल्याबाई कन्या विद्यालय ), तृतीय साक्षी शैलेशकुमार चौधरी ( सेंट अलायसेस ), तृतीय गट
प्रथम पालवी हेमंत चौधरी (के.नारखेडे विद्यालय ),द्वितीय मिताली रतिलाल चौधरी(अहिल्याबाई कन्या विद्यालय),तृतीय राजेश सिताराम पाटील (प.क.कोटेचा हायस्कूल ),चतुर्थ गट ( शिक्षक गट )
प्रथम अरविंद लक्ष्मण पाटील (गाडगेबाबा प्राथमिक),द्वितीय शितल योगेश इंगळे (र.न.मेहता प्राथमिक)तृतीय विनोद बबनराव उबाळे (अहिल्याबाई कन्या विद्यालय)यांनी बाजी मारली.


