भुसावळात उपस्टेशन मास्तरची रेल्वेखाली आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील नगरपालिका दवाखान्यामागील कुलकर्णी प्लॉट भागातील रहिवासी उप स्टेशन मास्टर पदावर कार्यरत असलेले मिलिंद दिवाकर मार्कंडे (वय 54)
यांनी रविवारी सायंकाळी टिंबर मार्केट जवळ अपलूक लाईनवर आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .
मध्य रेल्वेओ.पी.टी.जी.विभागात भुसावळ रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उप स्टेशन मास्टर पदावर कार्यरत असलेले मिलिंद दिवाकर मार्कंडे (वय 54) हे कार्यरत होते.दिनांक १ मार्च २०२० रविवार रोजी सायंकाळी ६.१० वाजेच्या पूर्वी त्यांनी टिंबर मार्केट जवळ (अपलूक लाईन) खंबा नंबर ४४३/बी/४-१ जवळील रेल्वे रुळावर मान ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
आत्महत्या केल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद १७४ सी.आर.पी.सी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.तपास लोहमार्ग पोलीस सपोनि बबन दिगंबर शिंदे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *