भुसावळात खून ; साकेगावातील दुग्धव्यावसायीकाचा भरदिवसा खून ; खुनानंतर आरोपी पसार

भुसावळ (प्रतिनिधी )-
साकेगाव येथील 40 वर्षीय दुग्ध व्यावसायीकाचा भुसावळातील जुना सतारा भागातील कोळी वाड्यात भर दिवसा खून झाल्याची घटना सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नासीर पटेल (40, रा.साकेगाव, ता.भुसावळ) असे मयताचे नाव असून धीरज गणेश शिंदे (22, जुना सातारा, भुसावळ) असे संशयीत आरोपीचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले
घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी डिवायएसपी गजानन राठोड , बाजारपेठ पो नि दिलीप भागवत यांचेसह पोलीस सहकार्यानी धाव घेत पाहणी केली . गुन्हा दाखल प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *