भुसावळ (प्रतिनिधी )- येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे सोमवार, दि. 2 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता कृष्णा अकॅडमी, प्रा. डॉ. सौ. शुभांगी दिनेश राठी यांचे राहते घर, बँक ऑफ महाराष्ट्रसमोर, राम मंदिर वार्ड, भुसावळ येथे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविल्याने त्यांची विविध पदांवर निवड व नियुक्ती झाली आहे, तसेच ज्या व्यक्ती सेवानिवृत्त झाल्या आहेत, या सर्वांच्या कार्याचा गौरव म्हणून गौरव समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितीचे आवाहन ज्ञानासह मनोरंजन गौरव समारंभ समितीने केले आहे.



