भुसावळ (प्रतिनिधी )-
नुकत्याच झालेल्या “एडू स्मार्ट ईंक” इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत शहरातील सक्सेस अकॅडमी च्या अबॅकस व वैदीक मॅथस च्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावून यश संपादन केले.या स्पर्धा नुकत्याच ठाणे येथे पार पडल्यात.
सक्सेस अकॅडमी ला यंदा “बेस्ट फ्रांचीसी” चे प्रथम पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत भुसावळ केंद्राच्या या अकॅडमी मधून ६५ विद्यार्थ्यांनी आपले गणितीय कसब पणाला लावले. स्पर्धेत एकूण भारतातून ३० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण काशिनाथ घाणेकर सभागृहात (ठाणे) येथे कल्पेश पाटील (चॆअरमन) “एडू स्मार्ट ईंक” यांच्या हस्ते झाले.
या विद्यार्थ्यांनी तीन मिनिटात १०० गणिते सोडविली. अबॅकस मध्ये आयुष निंबाळकर, साहिल पाटील, नील बडगुजर यांना प्रथम तर हर्षिता कोष्टी, भाग्यश्री पाचलोरे, रीद्धी भंगाळे, विभव धांडे यांना द्वितीय तर तोषवी बऱ्हाटे हिला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ओमांश पाटील, निहाल चव्हाण, हिमांशु पाटील, मितेश राठोड, स्नेहल चौधरी, अथर्व पाटील, गुणिका बढे यांना रनर अप चे बक्षीस मिळाले.
दत्तात्रय नेहेते, सर्वज्ञ जावळे, अथर्व कोठेकर, काव्या भोळे,तरुण आहुजा,पराग बेंडाळे, शिवांश परदेशी, मितांशू सोनावणे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. वैदीक गणितात किशन महाजन, महिमा पाटील यांना प्रथम तर मनीष राणे याला व्दितीय तर अथर्व अंबोले याला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. वीभव धांडे, सर्वेश चौधरी, सुमित गवळी, ध्रुव शिरणामे यांना रनर अप चे बक्षीस मिळाले. तर मानसी पाटील हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. हेमंत राठोड, अमोघ कोठेकर, वैभवी सावळे, भूमी पाटील, कृष्णा मोहनानी यांना रिजनल अचीर्वस चे बक्षीस मिळाले.



