भुसावळ तहसील कार्यालयासमोर भाजपचे धरणे आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातील शेतकरी कर्ज माफी,महिला अत्याचार तसेच भुसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्ड साठी होणारी फिरवाफिरव , रेशनकार्ड आॅनलाईन करणे यासह विविध प्रश्नांबाबतीत भुसावळ तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ तहसील कार्यलयासमोर महाआघाडी सरकारच्या विरोधात आज दि.२५ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्‍यात आले .
खिचडी सरकारचा धिक्कार असो,ठाकरे सरकारचा धिक्कार असो,सातबारा कोरा करा,महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे,शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे,हेक्ट्ररी २५ हजार मदत मिळालीच पाहिजे,सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करा,कोणत्याही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी एकाच वेळी यादी काढण्यात यायला हवी आदी घोषणाबाजी करण्‍यात आल्‍या.आ.संजय सावकारे,नगराध्‍यक्ष रमण भोळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्‍हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे,भुसावळ भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील,सरचिटणीस दिलीप कोळी,प्रशांत पाटील,शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस पवन बुंदेले,अमोल महाजन,शैलजा पाटील,पं.स.सभापती मनिषा पाटील,उपसभापती वंदना उन्‍हाळे,काॅटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे,रमेश मकासरे,माजी नगराध्‍यक्ष युवराज लोणारी,वसंत पाटील,अजय नागराणी,अॅड.बोधराज चौधरी,शिशीर जावळे,राजु खरारे,अर्जुन खरारे,भाजपा नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,शक्ति केंद्रप्रमुख ,बुथ प्रमुख, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य ,भाजपा कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *