दीपनगरात कामगारांचे न्याय व हक्काकरीता राष्ट्रीय मजदूर सेना आक्रमक ; कामगारांचे साखळी उपोषण सुरु

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ दीपनगर येथील २१० मेगावट गेट समोर
निर्मिती केंद्राच्या ठेकेदारा विरोधात कंत्राटी कामगारांनी परिवारासह साखळी उपोषणास सोमवार पासून सुरुवात करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास २ मार्च रोजी जेल भरो व बांगड्या फेको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जगन सोनवणे यांनी दिला आहे .
शासनाकडून नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले असून
त्याची अमलबजावणी दोनशे मेगावँट संच क्रमांक तीन येथील कामगारांचा वाढीव एरिया, वाढीय भत्ते अद्यापही
कामगारांच्या बँक खात्यावर जमा झाले नसून राष्ट्रीय मजदूर सेनतर्फे अनेक आंदोलन करण्यात आली. मात्र दीपनगर प्रशासनाकडून फक्त आश्वासनच देण्यात येत असल्याचे या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे. परिपत्रकाची त्वरित अंमलबजावणी करून थकबाकी ब वाढीय पगार त्यरित देण्यात यावा या करीता हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कामगार नेते जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे २ मार्च रोजी जेल भरो व बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सौ पुष्पा जगन सोनवणे , सुनील ठाकूर, गजानन खराटे, किरण सपकाळे, दीपक अडकमोल व अन्य पदाधिकारी
उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *