भुसावळात पालिका पेंन्शनर्स असोसिएशनचे लाक्षणिक उपोषण

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ म्युन्सीपल पेंन्शनर्स असोसिएशनच्या कर्मचार्‍यांनी सोमवार २४ रोजी पालिका कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले.
सर्वोच्च न्यायालयाने 23 सप्टेंबर 2019, 30 ऑगस्ट 2019 व 22 डिसेंबर 2019 रोजी दिलेलया आदेशाप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचारी यांना पेंशन विक्रीची रक्कम व इतर आर्थिक लाभ कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्वरीत अदा करावे, दिनांक 3 मार्च 2016 पासून 6 वा वेतन आयोगाचा फरक सर्वोच्च न्यायालय यांचा आदेश 7 एप्रिल 2017 व 10 फेब्रुवारी 2014 प्रमाणे त्वरीत अदा करावा, सन 2016 पासून पेंन्शनर्स व कार्यरत कर्मचा-यांना 7 व्या वेतनाचा फरक अदा करावा. लाड समिती व पागे समितीच्या शिफारसीनुसार त्वरीत नविन नेमणूका द्याव्यात, सफाई कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दिल्या जाव्यात, महाराष्ट्र शासनाच्या हेल्थ मॅन्युअल नुसार लोकसंख्येनुसार सफाई कामगारांच्या जागा वाढविणे बाबत शासनाला ठराव करुन पत्रव्यवहार त्वरीत सुरु कराव्या, ज्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना मानधनावर नेमणूक केली होती त्यांचा पगार त्वरीत अदा करावे, महाराष्ट्र शासनाच्या सन 2016 च्या परिपत्रका प्रमाणे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर 1 महिन्यांचे आत पेंशनविक्री व इतर आर्थिक लाभ देणे बंधनकारक असतांनाही मुख्याधिकारी यांनी दिलेले नाहीत.परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे मुख्याधिकारी व लेखापाल यांचेवर शिस्तभंगाची कारावाई करणेत यावी आदी मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू केला मात्र पालिका प्रशासन सातत्याने दूर्लक्ष करीत असल्याने सोमवारी अध्यक्ष एस. एल. पाटील यांच्या नेतृत्वात पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी लाक्षणिक उपोषण करुन प्रशासनानचे लक्ष वेधले. यावेळी एस.एल.पाटील, उपाध्यक्ष मधुकर इंगळे, सेक्रेटरी मधुकर पाटील, अरुण वाणी, प्रल्हाद कवटे, डिगंबर भोळे, प्रमोद राणे, किशोर वाघुळदे, अशोक सपकाळे, सुधाकर महाजन आदींसह पालिकेचे शेकडो सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *