कर्मचाऱ्यांवर अन्याय; २७ पासून आमरण उपोषणाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी )-
भु.औ.वि.केंद्र दीपनगर गेट जवळ कामगारांच्या प्रलंबीत प्रश्नां करीता प्रशासनाच्या विरोधात मंगळवार महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिसीटी वर्कर्स फेडरेशन तर्फे सकाळी 9 वा. आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र स्टे्ट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन दीपनगर शाखेच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दीपनगर येथे २० पासून उपोषण करण्यात आले . या उपोषणार्थिना अद्यापही न्याय मिळत नसल्याने मंगळवार रोजी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक प्रकाश गड यांना व संबंधितांना निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास येत्या २७ फेब्रूवारी पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा ,महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने देण्यात आला आहे .
निवेदनात नमूद आहे की , भुसावळ औष्णिक विज़ केंद्र व्यवस्थापनातील उपमुख्य अभियंता (प्रशासन) यांच्याकडे कामगारांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी असतांना गेल्या दोन वर्षा पासुन वर्कर्स फेडेरेशन शाखा दिपनगर सभासदांच्या ग्रीव्हेन्सवर (प्रश्न) नियमा प्रमाणे सोडविण्या बाबत जाणीव पूर्वक गेल्या दोन वर्षापासून बोलविले नसल्याने सभासदात नाराजी आहे. त्यातच युनियनला दिलेल्या गाळ्यामधील कोणतीही नियमा प्रमाणे लेखी अथवा तोंडी सूचना न देता किरकोळ बिल बाकी असतांना विज प्रवाह बंद केला. मात्र वसाहतीत ३ लाखांच्यावर विजबिल अनेक महिन्यापासून काही ठेकेदारांकडे बाकी असताना केवळ फेडेरेशनच्या गाळयाचे विज कनेक्शन कापल्याने याबाबत सदर अधिकारी पूर्वग्रहदूषित असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व अन्याया विरुद्ध दिपनगर विज केंद्रा समोर दि.२० पासून उपोषण सुरु केले आहे. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई संबंधीत अधिका-यांनी केलेली नसल्याने या अन्याया विरुद्ध दि.२७ फेब्रूवारी पासुन आमरण उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *