एस.टी.चालकास चाकूच्या धाक दाखवत मारहाण; शेलवड फाट्याजवळील घटना

बोदवड (प्रतिनिधी )-
बस चालकाला चाकूचा धाक दाखवून एकाने मारहाण केल्याची घटना शेलवड फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ५.५० वाजेच्या सुमारास घडली.
जामनेर आगाराचे बस चालक संजय भागवत टोंगळे (४० रा, कुर्हेपानाचे ता.भुसावळ ) हे मंगळवारी सायंकाळी जामनेर-बोदवड बस (एम.एच.२०डी.१९१४ ) ही शेलवड मार्गाने नेत असताना शेलवड-पळासखेड फाट्याजवळ अज्ञात आरोपीने दारूच्या नशेत बस अडवून बस चालक संजय भागवत टोंगळे यांना शिविगाळ करीत सरकारी गणवेशाच्या शर्टाचे बटन तोडुन वीट मारली तसेच चाकू काढून जीवे ठार मारण्याची धमकी दीली व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वी कलम ३५३,४४८,४२७,३३६,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्या आला असून तपास पोलिस नाईक उद्दल चौहान करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *