भुसावळात शिवजयंती मिरवणुकीस गालबोट ; दोन गटात हाणामारी ; पाच जखमी

भुसावळ (प्रतिनिधी )-
मिरवणुकीत तुमचे काय काम ? असे विचारण्याचा राग आल्याने येथील जळगाव नाका भागात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत एका गटातील आठ दहा जणांनी तलवारीसह प्लॅस्टीक पाईप व लाकडी दांड्याने मारहाण केल्याने यामध्ये पाच जण जखमी झाल्याची घटना दि.१९ रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जळगाव नाक्याजवळ घडल्याने शिवजयंतीला गालबोट लागले.
या प्रकरणी येथील शहर पोलिसात पाच जणांविरुद्ध दंगल व अँक्ट्रासिटीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील जळगाव नाका पिठाच्या गिरणी जवळ शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या मुकेश धर्मा राखुंडे (वय २४ रा. मारुती नगर जळगाव रोड भुसावळ ) व जितू भालेराव, पंकज बाविस्कर, भरत महाजन (रा. भुसावळ) यांना शिवजयंतीच्या मिरवणुकतीत तुमचे काय काम? असे जातीवाचक बोलून सहकार्‍यांना चिथावणी देत जातीवाचक शिविगाळ करुन मुकेश पाटील, अक्षय पाटील, झांबरे , सिमेंट वाल्याचा मुलगा, हर्षल उर्फ शिवाजी (तीघांची पूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा, भुसावळ) यांच्यासह ८-१० आरोपींनी हातातील तलवार, प्लॅस्टीक पाईप व लाकडी दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना दि. १९ रोजी रात्री १०.१५ वाजता जळगाव नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावण निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच शहर पो.स्टे.चे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात शांतता प्रस्तापित केली.
दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या मुकेश धर्मा राखुंडे व जितू भालेराव यांच्यासह जखमींवर जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. याबाबत शहर पोलिसात मुकेश राखुंडे यांच्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ३०/२०२०, भा.दं.वि. ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०६, मुंबई पोलिस अँक्ट १३५, अँक्ट्रासिटी अँक्ट १० (३) नुसार मुकेश पाटील, अक्षय पाटील, झांबरे, सिमेंट वाल्याचा मुलगा, हर्षल उर्फ शिवाजी (तीघांची पूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा, भुसावळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डिवायएसपी गजानन राठोड करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *