भुसावळ (प्रतिनिधी )-
पुणे विभागातील लोणावळा रेल्वेच्या सिग्नल अन्ड टेलीफोन विभागातील सांकेतीक पदावर असलेले बाबुसिंग पाटील यांना शिव जयंतीच्या मुहुर्तावर जी एम अवार्ड देऊन गौरविण्यात आले. श्री. बाबुसिंग हे वरिष्ठ अधिकार्यांच्या अचानक तपासणी पथकाला घाट सेक्शन मध्ये आपल्या कार्यावर भर पावसात तत्पर दिसुन आल्याने त्यांना सन्मानीत करण्यात आले. या सन्माना बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.



