बर्‍हाणपूरचा पाकिटमार भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ (प्रतिनिधी )-
डाऊन अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात चढणार्‍या प्रवाशाचे पाकिट लांबवण्या प्रकरणी बर्‍हाणपूरातील चोरट्यास लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शेख शब्बीर शेख हमीद (58, काळी मशीदजवळ, दौलतपुरा वॉर्ड क्रमांक 10, बर्‍हाणपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सचिन दत्तात्रय कांबळे (खडका पेेट्रोल पंपासमोर, खडका) हे 8 फेब्रुवारी रोजी सव्वा अकरा वाजता डाऊन 12833 अहमदाबाद हावडाने भुसावळून बडनेरा जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांचे पाकिट लांबवले होते. पाकिटात 28 हजारांची रोकड, पॅन कार्ड, फोटो, एटीएम व महत्वाचे दस्तावेज होते. या संदर्भात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा नोंदवल्यानंतर 11 रोजी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 15 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रामनारायण उपाध्याय, हवालदार जयकुमार कोळी, शैलेंद्र पाटील आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *