भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील प्रभाकर नगरातील रहिवासी तथा रेल्वेतील लोको पायलट किशोर भालचंद्र भारंबे यांच्या चारचाकीचे (क्रमांक एम.एच. 19 सी.एफ.1925) चे अज्ञात माथेफिरूने काच फोडल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. घराच्या आवारात चारचाकीवर हिरवे नेट टाकण्यात आले होते मात्र अज्ञाताने मागील काचेवर दांड्याने वार करीत गाडीचा मागील काच फोडला. ही घटना घडली तेव्हा भारंबे हे घराबाहेर होते मात्र त्यांना घटना कळाल्यानंतर शहर पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. भारंबे यांच्याकडून माहिती घेत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



