भुसावळ(प्रतिनिधी )-
येथील शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने, भाजप सरकारने सर्वोच्य न्यायालयात अनु जाती व जमातीच्या शासकीय नोकरी व पदोन्नतीच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात निदर्शने करुन 15 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात आले याबाबत प्रांताधिकारी यांना
निवेदन देण्यात आले. उत्तर महाराष्ट्र प्रदेंश काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाचे समन्वयक भगवान मेढे, जळगांव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रहीम कुरेशी,जळगांव जिल्हा काँगेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,भुसावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पाटील, उपाध्यक्ष विजय तुरकेले,ईस्माइल गवळी,गफुर गवळी,सुनिल जोहरे,विनोद पवार,सुजाता सपकाळे,नंदा सावळे,अनिता सपकाळे, निलेश थोरात,आदि उपस्थित होते.



