मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात यूटीएस अ‍ॅपची विक्रमी नोंद ; ३३.३० लाखांची तिकीट विक्री

भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ८फेब्रूवारी रोजी यूटीएस अ‍ॅप वापरुन मोबाइल तिकिट विक्रिची नोंद घेतली असून यामध्ये सर्वाधिक विक्री नोंदविली आहे. आतापर्यंत यूटीएस मोबाईल अॅपचा वापर करून ९.११ लाख प्रवाशांनी तिकीट बुक करून नवीन विक्रम नोंदविला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दोन महिन्या आधी दि. १६.१२.२०१९ रोजी नोंदविलेला ८.३३ लाखांचा विक्रम मागे टाकून दि. ८ फेब्रूवारी २०२० रोजी यूटीएस मोबाईल अॅपचा वापर करून ९.११ लाख प्रवाशांनी तिकीट बुक करून नवीन विक्रम नोंदविला आहे. दि. ८.२.२०२० रोजी मुंबई विभागात बुक केलेल्या एकूण प्रवाशांपैकी हे प्रमाण ११.५% आहे. मोबाईल तिकिट विक्रीतून मिळणारी कमाई ३३.३० लाख रुपये इतकी आहे, ज्याचे प्रमाण १३.७९% आहे.
मध्य रेल्वेच्या इतर विभागांनीही यूटीएस मोबाईल अ‍ॅपला असाच प्रतिसाद नोंदविला आहे. भुसावळ विभाग २११७ प्रवासी, नागपूर विभाग ५७३२ प्रवासी, पुणे विभाग ३८८२ प्रवासी आणि सोलापूर विभागातील ५९१ प्रवासी मोबाईल यूटीएसचा अॅप वरुन बुक केले.
 यूटीएस मोबाईल अॅपला लोकप्रिय करण्यासाठी अनेक मोहिमे सुरू करण्यामध्ये मध्य रेल्वे, मुंबई विभागातील वाणिज्य विभाग आघाडीवर आहे. प्रवाशांना यूटीएस अॅपची वैशिष्ट्ये, ते डाऊनलोड करण्याची प्रक्रिया आणि ते कसे वापरावे याबद्दल शिक्षित करण्यासाठी विविध स्थानकांवर अनेक ड्राइव्ह चालवले गेले आहेत. या व्यतिरिक्त तिकिट रोलवर, अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि रेडिओ जिंगल्सवर देखील यूटीएस अॅपची जाहिरात केली जात आहे. याशिवाय ५% बोनस आणि यूटीएस अॅपद्वारे सीजन तिकिटांची सहजतेने होणारी बुकिंग याची मोठी प्रशंसा केली जात आहे.
प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *