भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची तालुका कार्यकारिणी निवड नुकतीच करण्यात आली यात अध्यक्षपदी मेघःशाम शिंदे तर सचिवपदी ज्ञानदेव धांडे यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारणी याप्रमाणे – उपाध्यक्ष मनोज वारके (पि.ओ.नाहाटा महाविद्यालय, भुसाव. कार्याध्यक्ष विलास पाटील (श्रीकृष्ण हायस्कूल , शिंदी). सचिव लक्ष्मीकांत नेमाडे (महात्मा गांधी विद्यालय , वरणगाव) , सहसचिव अनिल महाजन (अरुणोदय माध्यमीक विद्यालय, बोहार्डी) सल्लागार म्हणून बियाणी मिल्ट्री स्कूल चे हिम्मतराव पाटील तर सदस्य विजय संकत, संन्ध्या बनसोडे (ताप्ती पब्लिक स्कूल ) , शरद पाटील , कीन्ही. यांची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकारी याचें शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, जळगाव जिल्हा शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ प्रदिप तळवलकर, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, डी व्ही चौधरी, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे सहसचिव प्रविण पाटील,जळगाव जिल्हा युवा शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील सचिव प्रा हरीश शेळके , भुसावळ तालुका गट शिक्षणाआधीकारी तुषार प्रधान, प्रा.संजय चौधरी , किशोर वायकोळे साहेब , बी डी धाडी , यांनी अभिनंदन केले आहे



