हात धुवा दिनानिमित्त पंचायत समितीत कार्यक्रमाचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
स्वच्छतेबाबत शासन स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमांतर्गत आज हात धुवा दिनानिमित्त पंचायत समितीच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ. सलीम तडवी पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्रकुमार फेगडे, कल्पना रावल कृषी अधिकारी पी एल मोरे, आरोग्य अधिकारी किशोर तायडे, संजय विसपुते शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे, गस सोसायटी चे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे कार्यालयीन कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेतला.
यावेळी राजेंद्रकुमार फेगडे यांनी बोलताना सांगितले की स्वच्छतेमुळे अर्ध्यापेक्षा जास्त आजार आपण दूर ठेवू शकतो आपण स्वच्छतेवर भर दिला पाहिजे जेवणाआधी हात स्वच्छ धुतले पाहिजे व इतरांना देखील याबाबतची माहिती दिल्यास आपण विविध आजारांना दूर ठेवू शकतो याप्रसंगी त्यांनी हात धुण्याची योग्य पद्धत कशी असते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थितांनी यावेळी हात धुतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *