भुसावळ (प्रतिनिधी )-
विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात कोविड १९ विरुध्द लढा देण्यासाठी जन आंदोलन अभियानाची शपथ दिनांक ८ रोजी मुख्यालयाच्या आदेश नुसार
सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता द्वारा देण्यात आली .
सर्व प्रथम सूत्र संचालन वरिष्ट मंडल कार्मिक अधिकारी श्री एन डी गांगुर्डे यांच्या द्वारे करण्यात आले . नंतर मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या द्वारा शपथ दिली गेली .या अभियान मुख्य उद्देश आहे की सर्वानी मास्क लावणे , सामाजिक दुरी चे पालन करावे , आपले हात –पाय नेहमी साबुन आणि पाणी ने स्वच्छ ठेवावे , नेहमी मास्क लावणे विशेष करून सार्वजनिक ठिकाणी वापर करावा . त्यासोबत कोविद १९ बद्दल नेहमी सतर्क राहावे जेणे करून आपले सहकारी आणि परिवार सुरक्षित राहील . ही शपथ देण्यात आली .
यामध्ये वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज आर पाटील , वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर के शर्मा , वरिष्ठ मंडळ यांत्रिक इंजिनियर लक्ष्मी नारायण , वरिष्ठ संरक्षा अधिकारी एन की अग्रवाल आणि सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते .



