विविध ज्वलंत समस्या तसेच प्रश्न सोडविण्यासाठी, बहुजन वंचित आघाडीतर्फे मागण्यांचे निवेदन सादर

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून संथ गतीने सुरू असलेले अमृत योजनेचे काम आणि पंचशील नगरातील दलित वस्तीतील अनेक गरजू पंचशीलनगर वासियांना अनेक दिवसापासून घरकुल मिळविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे अर्ज केला असून यातील अनेक प्रकरणे जवळपास वर्ष दोन वर्षापासून प्रलंबित आहे नागरिक सतत नगरपालिका बांधकाम विभागाच्या फैऱ्या मारून वैतागले तसेच पंचशील नगर भागातील शौचालयांची झालेली दुरावस्था व पिण्याचे पाणी यासह विविध समस्यांबाबत विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली परंतु अद्याप ही समस्या सोडविण्यात नगर पालिका उदासीन आहे तसेच पालिकेने येत्या दहा दिवसात समस्या त्वरित सोडवाव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १९ ऑक्‍टोबरला आमदार व नगराध्यक्ष यांच्या घरासमोर मोर्चा व निदर्शने करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना दिनांक ८ ऑक्टोबर रोजी देण्यात आले यावर विनोद सोनवणे,जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, दिनेश इखारे जिल्हा महासचिव, देवदत्त मकासरे, संजय सुरडकर जिल्हा सचिव, दिपक सुरवाडे, पंकज बोदडे, प्रणव सुरवाडे आदींच्या सह्या असून उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *