भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्याचे नुतन अप्पर पोलिस अधिक्षक
चंद्रकांत गवळी यांनी गुरुवार रोजी भुसावळ शहरातील शहर,
बाजारपेठ व तालुका पोलिस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत ,तालुका
पोलिस ठाण्याचे रामकृष्ण कुंभार , बाजारपेठचे सपोनि अनिल मोरे
व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक
यांनी भुसावळ पोलिस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी परिचय करून घेतला. भुसावळ तालुक्याची भौगोलिक, सामाजिक व राजकिय परिस्थिती जाणुन घेतली. तसेच भुसावळातील सध्यास्थितीतील वाढती गुन्हेगारी , रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती, गोोपनीय विभागाची माहिती ,जप्त केलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यांच्या
तपासा बाबतची माहिती जाणून घेऊन येणाऱ्या पुढील काळात
कामाच्या व तपासाच्या दिशेत कसा बदल करणे आवश्यक आहे
यावर पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी
पत्रकारांशी सुसंवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सध्याजिल्ह्यातील संपूर्ण पोलिस ठाण्यांचा पाहणी दौरा सुरू असून यातून प्रत्येक ठिकाणची माहीती जाणुन घेण्याचे काम सुरू आहे. प्रत्येकठिकाणी मनुष्यबळाच्या समस्या असून यावर वरिष्ठ पातळीवरून योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा तपास हा व्यवसायिक पध्दतीने झाल्यास त्यात तांत्रिक त्रुटी अथवा अडचणी राहत नाही त्यामुळे तक्रारदाराला न्याय दिला जातो. पोलिस प्रशासनाने भुसावळ शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसायांवर वचक बसवून गावासह तालुक्यात खाकीचा वचक बसविणे गरजेचाअसून येणाऱ्या काळात तशी कडक पाऊले उचलून विशेष कृती
अभियान राबविले जाणार आहे. अशी माहिती अप्पर पोलिस
अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितली.



