भुसावळात चोरट्यांनी धूम स्टाईल मोबाईल लांबवला ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरा लगतच्या कंडारी येथील पीओएच कॉलनी कॉलनी येथे रात्री जेवणानंतर अंगणात शतपावली करत मोबाईलवर बोलणार्‍या इसमाच्या हातातील मोबाईल मोटरसायकलवर आलेल्या भामट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शुक्रवारी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास घडली.
शनिवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंडारी येथील कॉलनीमधील रहिवाशी विलास विश्वनाथ सोनार हे शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजता तुम्हारा जेवण झाल्यावर रात्री घराच्या परीरसरात शतपावली करीत होते त्याच पावली करीत असताना ते मोबाईलवर बोलत होते. यात मोटरसायकलवर आलेल्या तीन मुलांपैकी एकाने त्यांच्या हातातला मोबाइल हिसकावून पळ काढला. हा मोबाईल सुमारे आठ हजार रुपये किमतीचा होता. विलास सोनार यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय कंखरे पुढील करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *