वरणगांव-
वरणगाव आयुध निर्मातील रहिवाशी एका तरुणाने हतनुर येथील पुलावरूण उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान घडली.
आयुध निर्माणी वसाहत मधील रहिवाशी व इंटक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र देशमुख कॉ नं ३ टाईप / ४६ / ए यांचा एकुलता एक मुलगा प्रताप रविद्र देशमुख ( २६ ) हा शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात काहीही न सांगता एम एच १९ ए जी ८६५० या क्रमाकांची मोटरसायकल घेऊन गेला . त्याची
दुचाकी हतनुर धरणाकडे पुलावर उभी होती . दरम्यान
पुलावरून पाण्यात उडी मारून त्याने आत्महत्या केल्याचे उघडकिस आले . शनिवार रोजी दुपारच्या वेळेस सावतर निभोरा गावाजवळ तापी नदीच्या किणारावर या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मयत प्रताप च्या नातेवाईकानी दिलेल्या खबरीवरुन अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे.
प्रताप देशमुख हा नुकताच बी ई चे शिक्षण घेतले होते व नौकरीच्या शोधत होता त्याच्या अचानक निघुन जाण्याने आयुध निर्माणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



