भुसावळ (प्रतिनिधी )-
रेलवे गाड्या मधे होणारे तांत्रिक बिघाड व तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या रेल्वे अपघातांवर त्वरित व सुनियोजित पद्धतीने कारवाई कशी करता येईल याची रंगीत तालीम भुसावळ विभागात घेण्यात आली .

सोमवार दिनांक – २८.०९.२०२० ला ३.३० वाजता भुसावळ नियंत्रण कक्षा मध्ये माहिती मिळाली कि गाडी क्रमांक – ०१०७२ अप वाराणसी – लोकमान्य टिळक विशेष गाडी शिरसोली – म्हसावद दरम्यान खांबा क्रमांक – ४०३/२८ ला २ बोगीला अपघात झाल्याचा संदेश मिळाला . त्यानुसार असिसिडेन्ट रिलीफ ट्रेन गाडी हि लगेच अधिकारी सह व मेडीकल स्टाफ घटना स्थळी रवाना झाले .आणि हे मॉक ड्रिल घेण्यात आले . या मधे अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा , वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील , वरिष्ट परिचालन प्रबंधक आर के शर्मा , वरिष्ट मंडळ संरक्षा अधिकारी एन के अग्रवाल , मुख्य चिकित्सा अधीक्षक सामंतराय, वरिष्ट मंडळ यांत्रिक इंजीनियर लक्ष्मीनारायण , वरिष्ठ मंडळ अभियंता ( समन्वय ) राजेश चिखले , सहायक विद्युत इंजीनियर आनंद भगत आणि सर्व कर्मचारी घटना स्थळी उपस्थित होते . आणि भुसावळ नियंत्रण कक्ष मधे अधिकारी उपस्थित होते . त्यानंतर गाड़ी 4.36 रवाना करण्यात आले .


