भुसावळ (प्रतिनिधी )-

विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय येथे स्वच्छता संवाद आणि कोविद 19 दरम्यान या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते, त्यात भुसावळ विभागातील सुमारे 50 जण सहभागी झाले होते. वेबिनारचे आयोजन सहाय्यक विभागीय यांत्रिकी अभियंता युनूस अन्सार यांनी आयोजित केले होते, अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा यांनी विशेष उपस्थिती होती. वेबिनार यशस्वी करण्यासाठी विभागीय मेकॅनिकल अभियंता के.के. शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.
बडनेरा, देवळाली, खंडवा, भुसावळ, मलकापूर, नाशिक, मूर्तिजापूर, अकोला, जळगाव, पाचोरा स्थानकांवर रेल्वे कर्मचार्यांनी संवाद रॅली काढली. मनमाड व शेगाव स्थानकांवर सीआरएमएसतर्फे संवाद रॅली काढण्यात आली. चाळीसगाव रोटरी क्लब मिल्क सिटीच्या वतीने संवाद रॅली काढण्यात आली, या संवाद रॅलीमध्ये कर्मचारी व वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता श्री एस. लक्ष्मी नारायण व सर्व शाखा अधिकारी पूर्ण उत्साहात सहभागी झाले.



