उमर खालीद यांची सुटका करा- संविधान बचाव समितीतर्फे मागणी – तहसिलदारांना निवेदन सादर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जेएनयूचे माजी अध्यक्ष उमर खालीद यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्यांची सुटका करावी, अशी मागणी भुसावळ संविधान बचावो समितीतर्फेकरण्यात आली असून याबाबत १६ रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .
उमर खालीद यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले असून त्यांनी केंद्र सरकार विरोधात केलेले आंदोलन हे संविधानाचे पालन केल्या नंतरही त्यांना अटक करण्यात आली आहे.
निवेदन देताना माजी नगरसेवक साबीर मेंबर, मो.मुन्वर खान, अ‍ॅड.एहतेश्याम, अ‍ॅड.मिर्झा आलम, रऊफ ठेकेदार, सलीम गवली, भगवान मेढे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *