भुसावळ (प्रतिनिधी )-
मंडल रेल प्रबंधक कार्यालय भुसावळ येथे दिनांक १४ ते २१ सप्टेंबर पर्यंत राजभाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त या आठवड्यात विविध कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहेत.
या अनुषंगाने १४ सप्टेंबर २०२० रोजी हिंदी दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या मुख्यालयातून प्राप्त झालेला संदेश मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी डीआरएम कार्यालयात वाचला.
यावेळी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक .मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी के. डी.गांगुर्डे राजभाषा अधिकारी एस.आर.वाढवे, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक राजेन्द्र शर्मा व सर्व शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



