भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने गाडी क्रं-12834/33 अहमदाबाद हावडा अहमदाबाद व गाडी क्रं- 12810/09 मुंबई हावडा मुंबई मेल या विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली असून आता या गाडया आठवडयातुन तीन दिवस धावणार आहे .
गाड़ी क्रं- 02834 अप हावडा – अहमदाबाद विशेष गाड़ी च्या फेरी मध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही गाड़ी हावडा स्थानका वरुन दिनांक 15 सप्टेंबर 20 पासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल.
गाड़ी क्रं- 02833 अप अहमदाबाद – हावडा विशेष गाड़ी च्या फेरी मध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही गाड़ी अहमदाबाद स्थानका वरुन दिनांक 18 सप्टेंबर 20
पासून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल. गाड़ी क्रं- 02810 अप हावडा – मुंबई मेल विशेष गाड़ी च्या फेरी मध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही गाड़ी हावडा स्थानका वरुन दिनांक 21सप्टेंबर 20 पासून दर सोमवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल.
गाड़ी क्रं- 02809 अप मुंबई हावडा मेल विशेष गाड़ी च्या फेरी मध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही गाड़ी मुंबई स्थानका वरुन दिनांक 23 सप्टेंबर 20 पासून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल.



