भुसावळात चाकूने भोसकत गोळी झाडून तरुणाचा निर्घुण खून ;हल्लेखोर फरार ;

भुसावळात चाकूने भोसकत गोळी झाडून तरुणाचा
निर्घुण खून ;
भुसावळ (प्रतिनिधी)-
येथील श्रीराम नगर भागात एका ३४ वर्षीय तरुणावर चार ते पाच हल्लेखोरांनी चाकुने वार करत गोळी झाडून खुन केल्‍याची घटना दि.२५ आॅगष्ट रोजी रात्री ११-३० वाजेदरम्‍यान घडली. या खुनाच्‍या घटनेने भुसावळ शहर पुन्‍हा चर्चेत आले आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.त्यांचा शोध सुरु आहे. हल्लेखोर साधारण ४ ते ५ असावे असा अंदाज आहे. खूनाचे कारण मात्र समजू शकले नाही.
येथील श्रीराम नगर भागातील विलास दिनकर चौधरी (वय ३४) हा तरुण चाकू हल्‍ला व गोळीबारात मयत झाला असून त्‍याची आई यात जखमी झाली आहे. या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्‍याचे पोनि.दिलीप भागवत व पथकाने घटनास्थळी धाव घेतली.गंभीर जखमी अवस्थेत विलास चौधरी यास डाॅ.राजेश मानवतकर यांच्‍या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यास डॉ.मानवतकर यांनी मयत घोषीत केले.चाकुने सपासप वार व
गावठी पिस्‍तुलने गोळी झाडून खुन करण्यात आलेल्या तरुणावर पुर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असावा असे बोलले जात आहे.मयत विलास हा मुंबईला राहत होता व गणपतीसाठी तो भुसावळ आला होता.तो घरातील एकुलता मुलगा होता .फरार हल्‍लेखोरांच्‍या तपासासाठी पोलीस यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *