भुसावळ (प्रतिनिधी )-
खामगाव व कल्याण येथून दोन मोटारसायकली चोरणा-या भुसावळ येथील मुस्लीम काॅलनीतील अल्पवयीन ईराणी मोटारसायकल चोरास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शोधुन काढले असून त्याला पकडून संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी सीआरपीसी ४१(अ)प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० हजार रू.किमतीची तर खडकपाडा कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८० हजार रू.किमतीची अशा १ लाख ५० हजार रू.किमतीच्या दोन काळ्या व लाल रंगाच्या पल्सर गाड्या चोरून नेल्याचे दोन गुन्हे दाखल होते ते आता उघडकीस आले.अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील
एएसआय.अशोक महाजन
पोहेकाॅ.शरीफोद्दीन काझी,
सूरज पाटील,पोना.युनूस शेख,
पोना.किशोर राठोड,
पोना.अरूण राजपूत
पोकाॅ.रणजीत जाधव यांनी केली.



