भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे कोरोना वैश्विक महामारी च्या काळात आपला जीव धोक्यात घालून अखंडपणे मानवजातीची सेवा करीत असलेल्या डॉ विनोद चौधरी, डॉक्टर पी व्ही पाटील व डॉक्टर वसीम शेख ,यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले .
प्रसंगी रेड क्रॉस सोसायटी जळगाव चे डॉक्टर सोनवणे यांचेसह त्यांच्या संपूर्ण टीमचा देखील रक्तदान शिबिरात सहकार्य केले म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे आदेशाने तसेच जिल्हाप्रमुख प्रमुख तथा मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले होते .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक अफसर खान अल्पसंख्यांक आघाडीचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, हिरामण पाटील, समाधान पाटील, सुभाष पाटील ,उपतालुका संघटक प्रकाश कोळी ,ज्येष्ठ शिवसैनिक सुनील कोळी ,सुरेश चौधरी, निळकंठ सरोदे यांच्यासह निलेश सुरडकर ठाकूर ,अतुल पाटील, कैलास पाटील निखिल चौधरी, बाळा गुजर ,पंकज पाटील, राहुल बावणे, रोहित मुळे ,सागर वंजारी ,विपुल बंगाळे ,मयूर चौधरी ,दीपक पाटील ,सागर लोंढे, सागर वाघ, दीपक पाटील, शिवा भोई ,गोली भोई ,विनोद महाजन ,वसंत नेहते सर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
प्रसंगी वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोसावी वरणगावातील गणपती हॉस्पिटलचे डॉ. पी व्ही पाटील, डॉ.वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक मराठे, शहराध्यक्ष संतोष भाऊ माळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज भाऊ पाटील, युवक काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील, सुदर्शन जाधव,
राजू पालीमकर, शिवसेनेचे दिपक धांडे, ऍड. लोखंडे, दिव्यांग सेवक देविदास चौधरी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आकाश कुरकुरे यांची उपस्थिती होती



