भुसावळ(प्रतिनिधी)-
सार्वजनिक बांधकाम विभाग जळगावचे अधिक्षक अभियंता यांना महाराष्ट्र राज्य कंञाटदार महासंघातर्फे जीआर ची होळी करून प्रलंबित देयके मिळण्याची व जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील सर्व कंञाटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर,सहकारी संस्था यांच्या वतीने राज्यातील सा.बां. विभागाने काढलेल्या शासन निर्णय विरोधात जळगाव कार्यालयात निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला.सदर निर्णय त्वरीत रद्द करावा,राज्यातील सुमारे ३ लाख कंञाटदारांची देयके वर्ष भरापासून प्रलंबित आहे ती त्वरीत मिळावित व न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा ईशारा संघटनेच्या पदाधिका-यांनी दिला आहे.



