भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची महाराष्ट्र राज्य निसर्ग सामाजिक व पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश रा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी श्री शिशिर जावळे यांची नियुक्ती केली आहे. याबद्दल त्यांना त्यांना नुकतीच नियुक्ती पत्र मिळाले आह त्यांना त्यांच्या भावी पुढील वाटचालीसाठी सुद्धा वृक्षमित्र प्रदेशाध्यक्ष श्री आबासाहेब मोरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
शिशिर जावळे यांच्या पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या कार्याची दखल घेत तसेच त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार-प्रसार समितीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत, तसेच राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष असून, त्यांच्या साई निर्मल फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी आजपावेतो विविध पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध रॅली वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुद्धा राबविलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या विविध सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. श्री शिशिर जावळे यांनी पर्यावरण संरक्षण संवर्धन व प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती करून मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.



