जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे भाजप सरकारचा निषेध ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्र सरकारने काँग्रेस विरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे भाजप सरकारचा निषेध करण्यात आला असून याबाबत २७ जुलै रोजी प्रांत अधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देण्यात आले .
जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे भाजपच्या केंद्र सरकारने काँग्रेस विरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिपभैय्या पाटिल यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळेस जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, भुसावळ तालुका अध्यक्ष पंकज पाटील,इस्माईल गवळी,महेबूब खान,गफुर गवळी,काँग्रेस असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेशभैय्या बारसे,विक्रम वानखेडे, जावेदभाई,काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड विजय तायडे ,विजय तुरकेले, शहराध्यक्ष सुनिल जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *