भुसावळ (प्रतिनिधी)-
शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सीजन व्हेंटिलेटर ची गरज भासल्यास जळगाव अथवा गोदावरी हॉस्पिटलला रुग्णांना पाठवले जाते याकरीता रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली व रोटरी क्लब भुसावल रेल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळातील ट्रामा सेंटरमध्ये मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणाली देण्यात आले आहे.या प्रणालीचा लोकार्पण सोहळा बुधवारी २९ जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे गंभीर रुग्णांना ऑक्सीजन व्हेंटिलेटर ची गरज भासते ही सुविधा भुसावळात नसल्याने रुग्णांना येथून जळगाव अथवा गोदावरी हॉस्पिटलला पाठवण्यात येते योग्यवेळी ऑक्सीजन व्हेंटिलेटर न मिळाल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात तसेच भुसावळातील ट्रामा सेंटरमधील आयसीयु ला मध्यवर्ती ऑक्सीजन प्रणाली लोकसहभागातून करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले होते याची दखल घेऊन रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांच्या माध्यमातून प्रतिसाद देत चाळीस खाटांचे मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणालीसाठी दोन लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे या प्रणालीचा बुधवार आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ चे आमदार संजय सावकारे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने उपजिल्हाधिकारी सावंत पाटील रोटरीचे माजी प्रांतपाल तथा रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे राजीव शर्मा रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी चे प्रेसिडेंट संदीप जोशी पदाधिकारी असतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे सोशल डिस्टन्स पाळून या लोकार्पण सोहळा पार पडणार असून या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली फेसबुक पेज वरून लाईव्ह करण्यात येणार आहे याचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे

सुविधा मिळावी याचा प्रयत्न
भुसावळ शहरासह ग्रामीण भागातील अपघात ग्रस्त अथवा गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळावे व त्यांचे प्राण वाचावे यासाठी भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये 40 खाटांचे मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणाली उभारण्यात आली असून यापुढे देखील मदत करू
सुधाकर सनांसे प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ


