भुसावळ (प्रतिनिधी )-
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रु. / मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयाची यशाची उज्वल पंरपरा नेहमीप्रमाणे या ही वर्षी कायम राखली आहे. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 95.23 टक्के, वाणिज्य शाखेचा 95.81 टक्के, कला शाखेचा 82.51 टक्के निकाल लागलेला आहे. महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम मंत्री कौस्तुभ दिपक (91.38 टक्के) व व्दितीय पाटील अनिकेत संजीव (91.23 टक्के) तृतीय वारके वरदा दिपक (89.23 टक्के) तसेच वाणिज्य शाखेत प्रथम बसंतानी कोमल नविन (93.38 टक्के) व्दितीय चौधरी हर्षाली जितेंद्र (92.61 टक्के) तृतीय झंवर प्रचिती सुनिल (92.30) व कला शाखेत प्रथम दोदानी संजना धमेंद्र (83.38 टक्के) व्दितीया किनगे निखील दिलीप (77.69 टक्के) तृतीय पिंजारी मुस्कान शेख फरीद (76.46 टक्के) वरील विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतुन महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय आलेले आहेत. तसेच किमान कौशल्य शाखेचा 87.08 टक्के निकाल लागलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी मधुन प्रथम पाटील डिंगबर गणेश (61.07 टक्के), व्दितीय धनगर वर्षा कैलास (58.46 टक्के), तृतीय तायडे भागवत युवराज (58.15 टक्के) आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी मधुन प्रथम बोदडे ज्ञानेश्वर शिवाजी (63.53 टक्के), व्दितीय ढाके मयुर नरेंद्र (62.15 टक्के), तृतीय आमोदकर वैभव कालिदास (60.30 टक्के) तसेच अकॉउंटीग फायनानशीयल व ऑफीस मॅनेजमेंट मधुन प्रथम पाचपांडे निकीता रविंद्र (73.53 टक्के), व्दितीय लोंढे ओमिका किरण (69.69 टक्के), तृतीय महाजन काजल अनिल (68.00 टक्के)
एकंदरीत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकालाचा विचार करता बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी मध्ये वाटचाल करतील. तसेच वाणिज्य शाखेतुन बरेचसे विद्यार्थी सी.ए. आणि सी.एस मध्ये वाटचाल करतील.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक, चेअरमन महेश देविदास फालक, सेक्रेटरी विष्णु श्रावण चौधरी, संजयकुमार सुशिलकुमार नाहाटा समस्त संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. सौ. एम. व्ही. वायकोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शैलेश बी. पाटील, पर्यवेक्षक यु. बी. नंदाणे आणि शिक्षक व कर्मचारी वृंद या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केलेले आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा ।



