अखेर साकेगाव ग्रामपंचायतीचे मंगल कार्यालय पूर्णत्वाच्या दिशेने ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी गावात मंगल कार्यालयाची कमी असल्याचे निदर्शनास आल्याने साकेगाव आदर्श गाव संकल्पनेला पूर्णविराम देण्यासाठी भाजपा प्रदेश प्रदेश सरचिटणीस खासदार रक्षाताई खडसे व भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी मिळून ४० लक्ष रुपयांचा निधी साकेगाव ग्रामपंचायतीला मंगल कार्यालय बांधकामासाठी दिला . त्यानुसार मंगल कार्यालय चूडामण नगरातील ओपन स्पेस जागेत बांधकाम सुरू झाले, मात्र त्या ठिकाणी काही ग्रामपंचायतीच्या हीतचिंतक यांनी हे कार्य तडीस जाऊ नये यासाठी एका क्रेशर चालकाला हाताशी धरून थेट न्यायालयात बांधकामाला स्थगिती मिळावी यासाठी अर्ज केला होता . मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने कागदपत्रांची व प्रशासकीय नियमाच्या अधीन राहुन ग्रामपंचायत प्रशासनाने नियमात बांधकाम केल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तो अर्ज फेटाळला गेला
आणि मंगल कार्यालयाच्या स्लॅप चे काम सुरू झाले .तब्बल ३६ बाय ७० फूट लांबीचे बांधकाम त्याठिकाणी पूर्णत्वास आलेले आहे मंगल कार्यालय लवकरच पूर्ण होऊन ग्रामस्थांसाठी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
मंगळवारी या बांधकामाची पाहणी करताना सरपंच अनिल पाटील माजी सरपंच आनंद ठाकरे ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे, आदींची उपस्थिती होती.
मंगल कार्यालय बांधकामामुळे ग्रामपंचायत प्रशासन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सज्ज झालेले आहे. याचा ग्रामस्थांमध्ये आनंद असून भाजपा प्रदेश सरचिटणीस खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांचे साकेगाव ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *