भुसावळ( प्रतिनिधी ) –
शहरातील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कामठी नागपूर नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके दिनांक ८ जुलाई रोजी भुसावळ नगरपरिषदेचा पदभार सांभाळणार आहे.
भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारीपदी कामठी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली करण्यात आली असून पालिकेच्या तत्कालीन अधिकारी करुणा डहाळे या ७ जुलैपासून कार्यमुक्त करण्यात आले असल्याचे शासनाचे अपर सचिव सचिन द.सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या ७ जुलै रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, शहरात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने करुणा डहाळे यांना तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवल्याने शहराचा प्रभारी अधिकार्यांकडे पदभार सोपवण्यात आला होता तर पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी देखील नगरसेवक पिंटू कोठारी यांनी नूतन जिल्हाधिकार्यांकडे केली होती. पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाल्याने शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा होऊन कामांना चालना मिळेल अशा आशा पल्लवित झाल्या आहे.



