भुसावळ व वरणगावकरांची आजी-माजी आमदारांकडून दिशाभूल-जगन सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्‍यातील जनतेसाठी ठोस असे काही करता न आल्‍याने आगामी भुसावळ व वरणगाव या दोन नगरपरिषदांच्‍या निवडणुका डोळ्‍यासमोर ठेऊन आजी माजी आमदार रिकामे विषय आणून नागरिकांची दिशाभूल करीत असल्‍याचे पिपल्‍स रिपाईसह विविध १० संघटनांचे नेते जगन सोनवणे यांनी सांगितले.ते शासकीय विश्रामगृहात आज दि.३ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी माजी पं.स.सदस्‍या व नगरसेविका पुष्‍पा सोनवणे,राकेश बग्‍गन,हरीश सुरवाडे,संतोष मेश्राम,अनिल सुरवाडे,मिलींद गाढे उपस्‍थित होते.
या पत्रकार परिषदेत जगन सोनवणे पुढे म्‍हणाले कि,सन १९९६ मध्‍ये तत्‍कालीन आमदार दिलीप भोळे यांच्‍या प्रयत्‍नातून वरणगाव-हतनुर येथे राज्‍य राखीव पोलीस केंद्र मंजूर झाले होते.माजी आ.संतोष चौधरी,आ.संजय सावकारेंसह बरेच आमदार होऊन गेलेल मात्र प्रशिक्षण केंद्राला साधी विटही लावू शकले नाही.
खोट्‍या वल्‍गना व खोटेपणा त्‍यांनी सोडायला पाहीजे.पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे आपल्या हाती दिली तर तालुक्यातील भुसावळ व वरणगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आल्या शिवाय राहणार नाही. सद्या राष्ट्रवादी पक्षाचे नाव घेणार्‍यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी समोर अपक्ष उमेदवार उभा करुन तोडपाणी करुन पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी पक्षाचे नाव घेऊ नये. तालुक्यातील तत्कालीन पोलिस व आताचे एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत मात्र तालुक्यातील दोन्ही नगरपरिषदांच्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजी-माजी आमदारांनी मिशन नगरपरिषदा सुरु करुन जनतेची दिशाभुल करित असून स्‍वत:च्‍या हितासाठी पक्ष बदलण्‍याचा व्‍यवसाय ते करीत आहे असा आरोपही पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांनी केला.
त्यांनतर तब्बल २५ वर्षांपर्यंत आजी-माजी आमदार का झोपले होते का? काल परवापासून यांची कुंभकर्णी झोप उघडली का? असा प्रश्‍न उपस्थित केला. यापूर्वी वरणगाव येथे आपण व माजी पं.स. सदस्या पुष्पा सोनवणे प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू व्‍हावे व वरणगाव नगरपरिषद होण्यासाठी रेल रोको व अन्य आंदोलन वरणगाव येथे केले होते. बँकांमध्‍ये मोठ्‍या प्रमाणात कर्ज प्रकरणाचा घोळ सुरू असुन त्‍यासाठी आंदोलन उभारणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *