जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द ;


जळगाव (प्रतिनिधी )-
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत संपूर्ण देशभरात ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे.त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे जुलै, २०२० मधील पहिल्या सोमवारी होणारा ६ जुलै, २०२० चा नियोजित जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *