मध्य रेल्वे नागपूर आणि मुंबई दरम्यान अतिरिक्त दिवाळी विशेष गाड्या चालवणार ;

भुसावळ (प्रतिनिधी)-

दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत:

*१. नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडी (८ सेवा)*

गाडी क्रमांक 01083 लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ६.११.२०२६, दिनांक ८.११.२०२६, दिनांक ११.११.२०२६ आणि दिनांक १३.११.२०२६ रोजी १७.०५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01084 नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी, नागपूर येथून दिनांक ५.११.२०२६, दिनांक ७.११.२०२६, दिनांक १०.११.२०२६ आणि दिनांक १२.११.२०२६ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१५ वाजता पोहोचेल.

*थांबे:* वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.

*संरचना:* ४ वातानुकूलित द्वितीय, ८ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

*२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी (४ सेवा)*

गाडी क्रमांक 01085 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०७.११.२०२६ आणि दिनांक ०९.११.२०२६ रोजी १५.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०७.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01086 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी, नागपूर येथून दिनांक ०८.११.२०२६ आणि दिनांक १०.११.२०२६ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल.

*थांबे:-* दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

*संरचना:* २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय श्रेणी आसन व्यवस्था व गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

*आरक्षण:* या विशेष गाड्यांसाठी (विशेष शुल्कासह) दिनांक *०४.११.२०२६* पासून आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित डब्यांचे  तिकीट सामान्य दराने 'यूटीएस' प्रणालीद्वारे काढता येतील. प्रवासी तिकिटे बुक करण्यासाठी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा 'एनटीईएस' ॲप डाउनलोड करा.
----------------