मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पूजा, दिवाळी व छठ सण २०२६ निमित्त अधिसूचित केलेल्या विशेष गाड्यांना चाळीसगाव व पाचोरा स्थानकांवर दिनांक २० ऑक्टोबर २०२६ पासून खालीलप्रमाणे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव स्थानकांवर अतिरिक्त थांबा
1) गाडी क्र. 01201/01202 – नागपूर–हडपसर–नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी
- गाडी क्र. 01201 (नागपूर–हडपसर): चाळीसगाव स्थानकावर आगमन ०३:४० व प्रस्थान ०३:४२ वाजता.
- गाडी क्र. 01202 (हडपसर–नागपूर): चाळीसगाव स्थानकावर आगमन २१:५० व प्रस्थान २१:५२ वाजता.
2) गाडी क्र. 01209/01210 – नागपूर–हडपसर–नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी

- गाडी क्र. 01209 (नागपूर–हडपसर): चाळीसगाव स्थानकावर आगमन ०३:४० व प्रस्थान ०३:४२ वाजता.
- गाडी क्र. 01210 (हडपसर–नागपूर): चाळीसगाव स्थानकावर आगमन २१:५० व प्रस्थान २१:५२ वाजता.
3) गाडी क्र. 02139/02140 – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर–मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी
- गाडी क्र. 02139 (मुंबई –नागपूर): चाळीसगाव स्थानकावर आगमन ०६:२५ व प्रस्थान ०६:२७ वाजता.
- गाडी क्र. 02140 (नागपूर–मुंबई): चाळीसगाव स्थानकावर आगमन २०:४५ व प्रस्थान २०:४७ वाजता.
पाचोरा स्थानकांवर अतिरिक्त थांबा
4) गाडी क्र. 01403/01404 – पुणे–अमरावती–पुणे साप्ताहिक विशेष गाडी
- गाडी क्र. 01403 (पुणे–अमरावती): पाचोरा स्थानकावर आगमन ०४:३० व प्रस्थान ०४:३२ वाजता.
- गाडी क्र. 01404 (अमरावती–पुणे): पाचोरा स्थानकावर आगमन १६:३५ व प्रस्थान १६:३७ वाजता.
या थांब्यांमुळे चाळीसगाव व पाचोरा परिसरातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांनी रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना संबंधित गाड्यांचे वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात येत आहे.


