भुसावळ विभागात जळगाव–भादली ५व्या रेल्वे मार्गावरील वेग चाचणी , दरम्यान रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे नागरिकांना आवाहन ;

भुसावक (प्रतिनिधी)-मध्य रेल्वे, भुसावळ विभागात जळगाव–भादली ५व्या रेल्वे मार्गावरील वेग चाचणीदरम्यान रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे नागरिकांना आवाहन*

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत जळगाव–भादली या ११.५१ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावरील ५व्या रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वे संरक्षा आयुक्त, मध्य सर्कल, मुंबई यांच्यामार्फत दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान संबंधित रेल्वे मार्गावर वेग चाचणी (स्पीड ट्रायल) घेण्यात येणार आहे.

वेग चाचणीदरम्यान रेल्वेगाड्या अधिक वेगाने धावू शकतात. अशा परिस्थितीत रेल्वे रुळांजवळ जाणे, रुळ ओलांडणे, रेल्वे मार्गाच्या कडेला उभे राहणे किंवा रेल्वे रुळांवर कोणत्याही प्रकारची हालचाल करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सर्व नागरिक, शेतकरी, शेतात काम करणारे मजूर, मुले आणि तरुणांना आवाहन करण्यात येते की, वेग चाचणीदरम्यान ५व्या रेल्वे मार्गासह सर्व रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे. रेल्वे रुळांवर किंवा त्यांच्या आसपास विनाकारण जाऊ नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत रेल्वे रुळ ओलांडण्याचा किंवा रुळांजवळ उभे राहण्याचा धोका पत्करू नये.

जनसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, रेल्वे रुळांपासून दूर राहावे आणि वेग चाचणी सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात येत आहे.