भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराना विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्या अडचणींबाबत आज सोमवार दिनाक १९ ऑक्टोबर रोजी भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार नीता लबडे यांना भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे दुकानदारांनी निवेदन दिले आहे. आगामी काळात सणासुदीचे दिवस असल्याने स्वस्त धान्य दुकानदार यांना विविध प्रकारचा अडचणी निर्माण होत असतात. त्या अडचणी सुटाव्यात त्याबद्दल भुसावळ तालुका तहसीलदार निता लबडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहे. १) जळगाव तसेच भुसावळ धान्य गोदामातून येणारे धान्य गहू, तांदूळ, मका, स्वच्छ व चांगल्या प्रकारे द्या. २) प्रत्येक कट्यामध्ये धान्य प्रमाणात ५०.५०० प्रमाणे मिळावे. ३) धान्य दुकानात २० तारखेच्या आत स्वस्त धान्य दुकानदारांच्या दुकानात पोहच करून द्यावे. ४) धान्य दुकानात पोहोचल्यानंतर लगेच मशीन मध्ये डाटा टाकण्यात यावा. ५) मिशन सुधार अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांच्या दुकानातील कमी झालेले कार्ड धारकांच्या जागेवर पुन्हा नवीन लाभार्थी वाढविण्यात यावे. अशा विविध मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे. यावेळी निवेदन देताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कैलास उपाध्याय, तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, रावेर भुसावळ विभाग अध्यक्ष संतोष माळी, तालुका उपाध्यक्ष सी.आर. पाटील, भुसावळ शहराध्यक्ष आरिफ मिर्झा, तालुका कार्याध्यक्ष पंकज पाटील, तालुका संघटक ईश्वर पवार, महिला अध्यक्ष टिना धांडे, तालुका प्रसिध्दी प्रमुख संघरत्न सपकाळे, शहर प्रसिध्दी प्रमुख उमाकांत शर्मा, नितीन जैन, सुमित मोरे, धीरज बराटे हे उपस्थित होते.


