भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ – सध्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी नारी शक्ती चा सन्मान केला जातो आहे.तर काही ठिकाणी दांडिया गरबा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत मात्र सुनसगाव येथील ग्रामविकास युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी एक वेगळा पायंडा पाडला असून गावातील महिला ज्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात त्या शौचालयाची साफसफाई केली असल्याने गावातील तरुणांचे कौतुक केले जाते आहे. येथील स्मशानभूमी रस्त्यावरील महिला शौचालयाची अवस्था अतिशय खराब झाली होती त्यामुळे महिलांना शौचालयासाठी रस्त्यावर बसावे लागत होते आणि त्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे विजया दशमी व नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा विचार ग्रामविकास युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी केला असून विजया दशमीच्या एक दिवस अगोदर पाण्याचे टँकर आणून तरुणांनी शौचालयाची साफसफाई केली. आणखी पुन्हा येत्या आठवड्यात इतर शौचालय तसेच मुतारी यांचीही साफसफाई करण्यात येणार असल्याचे समजते. आता स्मशानभूमी रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. ग्रामविकास युवा मंच च्या युवकांनी गावाच्या विकासाचा ध्यास घेतला असून लवकरच ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गावात विकासकामे सुरू करण्यात येणार असल्याचे सरपंच पती भोजराज कोळी यांनी या प्रसंगी सांगितले असून स्मशानभूमी रस्त्यावरील महिलांच्या पंधरा शौचालयाची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येईल असे आश्वासन सरपंच सौ काजल कोळी यांनी सांगितले आहे.


