मुनव्वर खान यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम; काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित भुसावळ (प्रतिनिधी)- भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता भुसावळ येथे साजरी करण्यात आली. मुनव्वर खान यांच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मुनव्वर खान होते. यावेळी उपस्थित मान्यवर व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये तसेच तरुणांमध्ये शिक्षण, संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा जागविण्यात डॉ. कलाम यांनी दिलेले योगदान यावेळी स्मरणात ठेवण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रवीण भाऊ सुरवाडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मुनव्वर खान, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, शहराध्यक्ष अहमद इब्राहिम कुरेशी, संजय खडसे, माजी नगराध्यक्ष नईम पहेलवान, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष विलास खरात, रानी खरात, सागर वानखेडे, इस्माईल पहेलवान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी यांनी दिली.


